PhonePe मध्ये Account कसे बनवायचे? | How to Create PhonePe Account in Marathi

0
39

मित्रांनो भारत मध्ये ऑनलाईन Money Transfer व Digital Payment चा लेन-देन खूप जास्त वाढला आहे, जसे तुम्हाला फोन मध्ये पेटीएम, Google Pay, Bhim UPI इत्यादी खूप सारे Digital Payment चे Apps बघायला मिळणार.

आज मी तुम्हाला PhonePe च्या संबंधित माहिती सांगणार आहे की PhonePe म्हणजे काय? व तुम्ही PhonePe चा वापर कसा करू शकता. PhonePe Yes बँक द्वारे संचालित केला आहे, त्यामुळेच PhonePe App Digital Payment साठी Safe आहे व खूप प्रसिद्ध सुद्धा आहे.

इतर डिजिटल पेमेंट Apps मध्ये जे options नाही आहे ते सगळे options तुम्हाला PhonePe App मध्ये दिसणार, PhonePe App हा UPI वर आधारित आहे म्हणजे तुमच्या बँक अकाउंट ला तुम्हाला PhonePe सोबत लिंक करावे लागेल त्यानंतर तुम्ही कधीही आणि कुठेही Digitally Payment करू शकणार.

PhonePe म्हणजे काय?

बरेच लोक PhonePe App ला मोबाइल e-Wallet सुद्धा म्हणतात कारण PhonePe App द्वारे तुम्ही mobile Recharge, electricity billMoney Transfer सारख्या गोष्टी ऑनलाईन तुमच्या मोबाईल द्वारे करू शकता.

PhonePe App UPI वर आधारित आहे आणि या App चा संचालन NPCI ने केला आहे जे इंडिया ची banking system ला Manage करतात. जर तुम्हाला एक वरून अधिक Bank मधून Online Money Transfer करायचा आहे तर PhonePe App तुमच्या साठी खूप चांगला आहे, कारण PhonePe मध्ये तुम्ही एक वरून अधिक बँक अकाउंट ला जोडू शकता.

PhonePe App द्वारे तुम्ही ऑनलाइन Shopping सुद्धा करू शकता, व तुम्हाला ऑनलाइन shopping वरती Cashback सुद्धा मिळणार, PhonePe App चा एक सगळ्यात चांगला फायदा हा आहे की जर तुम्ही Filpkart सारख्या ऑनलाइन वेबसाईट द्वारे काही खरेदी करणार तर तुम्हाला Discount च्या स्वरुपात Cashback दिला जातो.

PhonePe App मध्ये तुम्हाला Cashback च्या रूपा मध्ये पैसे मिळणार ज्यांचा वापर तुम्ही फक्त Online Shopping किंवा Recharge करण्यासाठी करू शकता. त्या Cashback च्या पैसे ला तुम्ही बँक अकाउंट मध्ये ट्रान्सफर नाही करू शकत.

PhonePe App मध्ये अकाउंट कसे बनवायचे?

मित्रांनो जर तुम्हाला PhonePe App मध्ये अकाउंट सुरू करताना अडचण येत असेल तर मी तुम्हाला PhonePe वर अकाउंट कसे बनवायचे या बद्दल मराठी मध्ये माहिती सांगणार आहे.

Step 1: Open PhonePe

तुमच्या फोन मध्ये PhonePe App असला पाहिजे, जर तुमच्या फोन मध्ये PhonePe App इंस्टॉल नसेल तर तुम्ही Play Store वरून PhonePe App ला इन्स्टॉल करू शकता. PhonePe App इन्स्टॉल झाल्यानंतर तुम्हाला PhonePe App ला open करायचे आहे.

Step 2: Register on PhonePe

PhonePe App ला open केल्यानंतर तुम्हाला Register Now असा एक बटन दिसेल तिथे तुम्हाला क्लिक करायचे आहे.

Step 3: Create PhonePe Account

Register Now वर क्लिक केल्यानंतर तुमच्यासमोर Create PhonePe Account चा Form खुलणार तिथे तुम्हाला तुमची पर्सनल इन्फॉर्मेशन Fill करायची आहे.

1. Phone Number – तुमच्या बँक अकाउंट सोबत जो फोन नंबर जोडला आहे तोच मोबाईल नंबर तुम्हाला इथे लिहायचा आहे व तो मोबाईल नंबर चा सीम कार्ड तुमच्या फोन मध्ये असला पाहिजे, कारण की एक SMS द्वारे OTP त्या मोबाइल फोन मध्ये येणार जो तुम्हाला इथे enter करावा लागणार.
2. Full Name – तुमचा मोबाईल नंबर Verify केल्यानंतर तुम्हाला स्वतःचे नाव Full Name मध्ये लिहावे लागणार.
3. Passcode – इथे तुम्हाला Security साठी चार अंक चा एक Passcode तयार करावा लागणार.

वरील सांगितल्याप्रमाणे सगळी इन्फॉर्मेशन fill केल्यानंतर तुम्हाला Continue बटन वर क्लिक करायचे आहे.

Step 4: Choose Language

आता तुम्हाला एक भाषा निवडावी लागेल जर तुम्हाला English येत असेल तर तुम्हाला English वर क्लिक केल्यानंतर OK क्लिक करावे लागणार, जर तुम्हाला हिंदी किंवा तुमची मातृभाषा select करायची असेल तर तुम्ही View Other Languages वर क्लिक करून तुमची भाषा select केल्यानंतर Done वर क्लिक करू शकता.

Step 5: Update Profile

तुमचा PhonePe अकाउंट Successfully create झाला आहे, आता तुम्हाला KYC व तुमच्या Profile ला update करावे लागेल त्यानंतर तुम्ही PhonePe मध्ये बँक अकाउंट तुमचं Add करून Digitally PhonePe App द्वारे पेमेंट करू शकणार.

निष्कर्ष

मित्रांनो मला खात्री आहे PhonePe म्हणजे काय? व PhonePe App स्वतःचे अकाउंट कैसे फोन करायचे याबद्दल तुम्हाला पूर्ण माहिती मिळाली असेल, PhonePe App ला वापरणं खूप सोपा आहे फक्त तुम्हाला PhonePe App द्वारे Digital Payment करता आलं पाहिजे.

Previous articleJio Mart मधून खरेदी कशी करायची? | How to buy grocery from JioMart
Next articleComputer मध्ये WhatsApp कसे चालवायचे? | How to Use WhatsApp in Computer

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here