Jio Mart मधून खरेदी कशी करायची? | How to buy grocery from JioMart

0
24

मित्रांनो Telecom Sector मध्ये जिओ आल्यानंतर भारत हा पूर्ण विश्व मधला एक असा देश झाला जिथे सगळ्यात स्वस्त इंटरनेट डाटा मिळतो. इंडिया मध्ये जिओ खूप लोकप्रिय झाला त्यामुळे जिओ नी स्वतःच्या ब्रँड नावाने एक ऑनलाइन Grocery Store सुरु केले ज्याचे नाव Jio Mart ठेवण्यात आले.

लोकांना Jio Mart म्हणजे काय व Jio Mart चा वापर कसा करायचा याबद्दल माहिती नाही आहे, म्हणून आज या लेख मध्ये मी तुम्हाला Jio Mart संबंधित सगळी माहिती सांगणार आहे.

Jio Mart म्हणजे काय?

Jio Mart ची सुरुवात Reliance Retail म्हणजेच जिओ प्लॅटफॉर्म द्वारे 2019 मध्ये डिसेंबर ला सुरू झाले, Jio Mart हा ऑनलाइन Grocery Store आहे, जिथून ग्राहक घरामध्ये आवश्यक सगळा किराणा ऑनलाइन Order करू शकतो.

Jio Mart ऑनलाइन Grocery दुकानांमधून तुम्ही घर बसल्या भाजीपाला व घरांमधील आवश्यक सगळ्या वस्तू जसे अंघोळीचे साबण, शाम्पू पासून तर गहू-तांदूळ पर्यंत सगळ्या गोष्टी ऑर्डर करून घरी मागवू शकता. Jio Mart मध्ये तुम्हाला ऑर्डर मिनिमम रिक्वायरमेंट नाही आहे तुम्हाला जितक्या गोष्टी ऑर्डर करायचे आहे तुम्ही करू शकता.

Jio Mart मध्ये पन्नास हजार वरून जास्त Grocery items available आहे जेणेकरून तुम्ही Jio Mart मधून तुम्हाला आवश्यक असणारे सगळी Grocery ऑर्डर करू शकता. इतकच नव्हे तर जर तुम्ही Jio Mart वरून कोणतीही Grocery ऑर्डर करणार तर तुम्हाला Free Home Delivery मिळणार म्हणजे तुमच्या घरी सामान पोचवण्याचे एकही रुपया Delivery charges तुम्हाला द्यावे लागणार नाही.

जर तुम्हाला कोणती Grocery आवडली नसेल किंवा कोणत्या Product शी तुम्ही संतुष्ट नसाल तर Jio Mart मोबाईल App द्वारे तुम्ही त्या Product ला वापस सुद्धा करू शकता.

Jio Mart मधून खरेदी कशी करायची?

मित्रांनो Jio Mart द्वारे Shopping करणे सोपे आहे, तुम्ही Jio Mart ची वेबसाईट किंवा Jio Mart च्या App द्वारे ऑनलाइन Shopping करू शकता.

तुम्ही Android Phone चा वापर करत असाल तर तुमच्या फोन मध्ये Jio Mart नावाचा app असाला पाहिजेल, या App द्वारे तुम्ही Jio Mart मधून Shopping करू शकता, तर लगेच तुमच्या मोबाईल मध्ये Jio Mart app इन्स्टॉल करावे.

Step 1: Jio Mart App open करावे

सगळ्यात आधी तुम्हाला Jio Mart App ला Play Store वरून इन्स्टॉल करावे लागणार, ॲप इन्स्टॉल झाल्यानंतर तुम्हाला Jio Mart app ला open करायचे आहे.

Step 2: Jio Mart मध्ये रजिस्टर करावे

Jio Mart app ला open केल्यानंतर सगळ्यात आधी तुम्हाला Jio Mart मध्ये अकाऊंट सुरू करावे लागणार, त्यासाठी तुम्हाला Jio Mart app मधील यूजर icon वर क्लिक करायचे आहे.

सगळ्यात आधी तुम्हाला स्वतःचे नाव व तुमचा ईमेल एड्रेस टाकावं लागणार, नंतर तुमचा जिओ नंबर टाकावे लागणार. त्यानंतर तुमच्या मोबाईल वरती एक OTP येणार त्या OTP ला टाकून तुमच्या Jio Mart अकाउंटचे व्हेरिफिकेशन प्रक्रिया तुम्ही पूर्ण करू शकता.

Step 3: Products निवडा

Jio Mart मध्ये तुमचे रजिस्ट्रेशन झाल्यानंतर Jio Mart app च्या होम पेज मध्ये तुम्हाला सगळ्या Product ची List मिळणार, तुम्हाला जी Grocery पाहिजे त्या ग्रोसेरी च्या बाजूला Add Button वर तुम्हाला क्लिक करायचे आहे.

अशाच प्रकारे तुम्हाला आवश्यक जे Product तुम्ही कार्ड मध्ये Add करू शकता, त्यानंतर जर तुम्हाला कोणता Product दोन वेळा हवा असेल तर तुम्ही पुन्हा त्या Add to Card वर क्लिक करायचे आहे.

Step 4: ऑर्डर द्यावे

जेव्हा तुमची Shopping पूर्ण होऊन जाणार, त्यानंतर तुम्हाला कार्ड icon वर क्लिक करायचे आहे. तिथे तुम्ही ऑर्डर केलेले सगळ्या सामानाची List व त्या सामानाची किंमत दिसणार.

जेव्हा तुमच्या ऑर्डर List सोबत तुम्ही संतुष्ट होणार, त्यानंतर तुम्हाला Place Order नावाच्या बटन वर क्लिक करायचे आहे, तिथे क्लिक केल्यानंतर तुम्हाला Delivery Address विचारला जाणार. तिथे तुम्हाला Delivery Address ॲड्रेस टाकावा लागणार.

आता तुम्हाला Payment Method विचारला जाणार तुम्हाला ज्या प्रकारे पेमेंट करायचा आहे तुम्ही करू शकता, जर तुम्हाला आता पेमेंट करायचे नसेल तर तुम्ही Cash on Delivery option वर क्लिक करू शकता आणि जर तुम्हाला ऑनलाईन पेमेंट करायचे असेल तर पेमेंट मेथड select केल्यानंतर तुम्हाला Make Payment वर क्लिक करावे लागणार.

Step 5: Product मिळवा

तुम्ही ज्या दिवशी Grocery ऑर्डर केली आहे, त्या दिवस पासून काही दिवस तुम्हाला Delivery घरी येत पर्यंत वाट पाहायची आहे. तसे तर Jio Mart मधून तुम्हाला 4 ते 5 दिवसांमध्ये Delivery तुमच्या घरी मिळून जाणार.

Jio Mart Distributor कसे बनायचे?

जर तुम्हाला Jio Mart Distributor बनायचे असेल तर सगळ्यात आधी तुम्हाला Jio Mart Distributor Portal च्या वेबसाईट मध्ये जावे लागणार. तिथे तुम्हाला Terms & Conditions दिल्या गेले आहे की तुम्ही कशाप्रकारे Jio Mart Distributor बनू शकता.

तिथे तुमच्यासमोर एक Form open होणा,र जिथे तुम्हाला तुमचं नाव, ईमेल आयडी, मोबाईल नंबर व तुमच्या शहर चा पत्ता, पिन कोड विचारल्या जाणार. इथे तुमची सगळी Personal Information fill केल्यानंतर तुम्हाला Submit बटन वर क्लिक करायचे आहे. त्यानंतर JioMart Distributor कडून तुम्हाला सगळी माहिती तुमच्या इमेल वर पाठवली जाणार.

निष्कर्ष

मित्रांनो मला खात्री आहे तुम्हाला Jio Mart म्हणजे काय?जिओ मार्ट मधून Shopping ऑनलाइन कशी करायची? याबद्दल माहिती मिळाली असणार, जर तुम्हाला Jio Mart संबंधित आणखी माहिती पाहिजे असेल तर तुम्ही Comment मध्ये मला Jio Mart विषयी प्रश्न विचारू शकता.

Previous articleBlogger Blog ला Permanently Delete कसे करायचे? | How To Delete A Blogger Blog Permanently
Next articlePhonePe मध्ये Account कसे बनवायचे? | How to Create PhonePe Account in Marathi

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here