ब्लॉग म्हणजे काय? ब्लोगिंग कशी करायची संपूर्ण माहिती

मित्रांनो ब्लॉगिंग कसे करायचे याबद्दल मी तुम्हाला माहिती देणार आहे, आज या लेख मध्ये मी तुम्हा सगळ्यांना सांगणार आहे की कसे तुम्ही लोकं सोप्या पद्धतीने स्वतःचा ब्लॉग सुरू करू शकता. ब्लॉगचं नाव घेतल्यास बरेच प्रश्न आपल्या डोक्यामध्ये येतात या बद्दल मला देखील माहिती आहे कारण जेव्हा सुरवातीला मी स्वतःचा ब्लॉग सुरू केला होता तेव्हा मला सुद्धा ब्लॉगिंगच्या विषयी जास्त माहिती नव्हती तर मला बऱ्याच जागेवरून ब्लॉगिंग संबंधी माहिती समजून घ्यावी लागली.

आजच्या काळामध्ये जर तुम्ही Student असाल किंवा तुम्ही Part Time काम करायचा विचार मनात ठेवत असाल तर तुम्ही देखील ब्लॉगिंग करू शकता. कारण ब्लॉगिंग कोणताही व्यक्ती करू शकतो, जर तुम्हाला लेखनाचा छंद असेल तर तुम्ही ब्लॉगिंग करू शकता.

ब्लॉग म्हणजे काय?

मित्रांनो ब्लॉगचा अर्थ एक अशी Website असते किंवा एक असा Web Page असतो ज्याला आपण सदैव Updated ठेवतो. ब्लॉग ला आपण Conversational style किंवा Informal style मध्ये लिहू शकतो. काहि वर्षा आधी बरेच लोकांना रोज Diary लिहायचा छंद असायचा त्याच प्रमाणे बरेच लोकांना ब्लॉग लिहायचा छंद सुद्धा असतो. फरक फक्त इतकाच आहे की रोज डायरी लिहिणारा व्यक्ती त्याच्या डायरीमध्ये त्यांनी पूर्ण दिवसभर काय काय काम केले आहे ते लिहीत असतो.

ब्लॉग म्हणजे काय?

सोप्या भाषेमध्ये म्हंटले तर जर एक शेतकरी रोज त्याची डायरी लिहित असेल तो शेतकरी त्याच्या डायरीमध्ये लिहिणार की सकाळी तो उठला त्यानंतर तो त्याच्या शेतामध्ये गेला त्यानंतर त्या शेतकऱ्याने शेतामध्ये पिक पाहिली आणि नंतर तो मार्केटमध्ये गेला. पण जर तो शेतकरी Blog लिहित असेल तर ब्लॉग लिहिताना तो त्याच्या ब्लॉग मध्ये लिहिले कि शेती कशी केल्या जाईल, शेतामध्ये जास्त गहू ची लागण कशी करायची, शेतामध्ये किती पाणी सोडलं पाहिजेल याबद्दल तो संपूर्ण माहिती त्याच्या ब्लॉग मध्ये लिहणार.

जर तुम्हाला कोणत्या एका विषयावरती Knowledge असेल तर तुम्ही तुमच्या Knowledge ला जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोचवायचे असेल तर त्याला तुम्ही डायरी मधी न लिहिता Web Page (Blog) मध्ये लिहिणार.

ब्लॉगिंग कसे सुरु करायचे?

मला खात्री आहे की आता तुम्हा सगळ्यांना ब्लॉग म्हणजे काय समजले असेल, तर चला मग मी आता तुम्हाला सांगणार की ब्लॉगिंग कसे सुरु करायचे किंवा स्वतःचा ब्लॉग कसा सुरु करायचा. ब्लॉगिंग सुरु करण्यासाठी तुमच्याकडे इंटरनेट सोबत जोडून राहण्यासाठी एक Device असणं अत्यंत गरजेचा आहे. ब्लॉगिंग करण्यासाठी तुमच्याकडे कॉम्प्युटर, लॅपटॉप किंवा तुमचा एक स्मार्टफोन असणं खूप आवश्यक आहे.

ब्लॉगिंग साठी विषय कसे शोधावे?

ब्लॉगिंग करण्यासाठी विषय किंवा Niche शोधणे जास्त अवघड नाही आहे, तुम्हाला ज्या विषयांमध्ये जास्त Knowledge आहे किंवा ज्या विषयाबद्दल तुम्ही लोकांना काही शिकवू शकाल अशा विषयावर तुम्हाला ब्लॉगिंग करायला पाहिजे. तुमचा ज्या विषयावरील Best Performance असेल तुम्ही तो विषय निवडू शकता. जसं मला ब्लॉगिंग व Technology विषयी जास्त Knowledge आहे म्हणून मी माझ्या ब्लॉगचा विषय ब्लॉगींग निवडला आहे.

How to Find Topics for Blogging

बरीच लोकांना टेक्नोलॉजी विषयी माहिती असते, तर त्या लोकांनी त्यांचा टेक्नोलॉजी Niche च्या संबंधित ब्लॉग सुरू करायला हवा, किंवा जर तुम्ही Fitness Trainer असाल तर तुम्ही हेल्थ किंवा Fitness संबंधित ब्लॉग सुरू करून त्या ब्लॉग मध्ये फिटनेसच्या काही Tips लोकांसोबत Share करू शकता.

ब्लॉगिंग साठी उचित प्लॅटफॉर्म कसे निवडावे?

तुम्हा सगळ्यांना ब्लॉगिंग काय आहे व ब्लॉग कसे सुरु करायचे याबद्दल तर समजले असणार पण ब्लॉग सुरू करण्यासाठी एक प्लॅटफॉर्मची गरज असते, आणि आजच्या तारखेला दोन पॉप्युलर ब्लॉगींग प्लॅटफॉर्म आहेत, पहिला ब्लॉगिंग प्लॅटफॉर्म स्वतः गुगल द्वारा आयोजित केलेला Blogger.com आहे व दुसरा ब्लॉगिंग प्लॅटफॉर्म WordPress म्हणजे CMS (कंटेंट मैनेजमेंट सर्विस) आहे ज्यामध्ये तुम्ही ब्लॉग सुरू करू शकता.

How to find best blogging platform in Marathi

1. Blogger

जर तुमच्याकडे ब्लॉगिंग मध्ये Invest करायला पैसे नाही आहेत तर तुम्हाला तुमच्या ब्लॉगची सुरुवात Blogger.com वर करायला पाहिजे, कारण Blogger मध्ये ब्लॉग सुरू करायला तुम्हाला एकही रुपया लागणार नाही, तुम्ही फ्री मध्ये ब्लॉगर वर एक सुंदर ब्लॉग बनवू शकता. Blogger मध्ये ब्लॉग बनवण्याचा आणखी एक फायदा असा आहे की तुम्हाला गुगल तर्फे एक फ्री Blogspot Domain सुद्धा मिळणार त्यामुळे Hosting चा, Domain चा खर्च वाचतो.

2. WordPress

ब्लॉगिंगच्या जगामध्ये सगळ्यात जास्त Blogs वर्डप्रेस प्लॅटफॉर्म वरती बनवले गेले आहे. वर्डप्रेस मध्ये ब्लॉग सुरू करण्यासाठी तुम्हाला काही पैशाची Investment करावी लागेल कारण वर्डप्रेस मध्ये वेबसाईट सुरू करण्यासाठी तुम्हाला Hosting आणि एक Custom Domain सुद्धा विकत घ्यावं लागेल. बऱ्याच होस्टिंग कंपनीस वर्डप्रेस होस्टिंग provide करतात तर तुम्ही काही पैसे Invest करून होस्टिंग घेतल्या त्यानंतर वर्डप्रेस ब्लॉगची सुरुवात करू शकणार.

ब्लॉगच्या माध्यमाने पैसे कसे कमवायचे?

मित्रांनो ब्लॉग द्वारे पैसे कमवण्यासाठी तुमचा ब्लॉग Google AdSense द्वारे Approved असायला हवा, तुमच्या ब्लॉग वर गूगल AdSense चा Approval मिळण्यासाठी तुमचा ब्लॉग 6 महिने जुना असायला हवा, व तुमच्या ब्लॉग वर 30 वरून अधिक स्वतः लिहिलेले Blog Post असले पाहिजे तेव्हाच तुमच्या ब्लॉग वर तुम्हाला गुगल एडसेंस चा अपूर्वल मिळणार.

How to make money from Blog

तुम्ही ब्लॉग च्या द्वारे खूप प्रकारे पैसे कमवू शकता, जर तुमच्या ब्लॉग मध्ये जास्त प्रमाणात ट्राफिक येतो आहे तर तुम्ही Affiliate Marketing च्या माध्यमाने Amazon Affiliate किंवा Flipkart Affiliate सारख्या Brands चे products तुमच्या वेबसाईट च्या द्वारे प्रमोट करून पैसे कमवू शकता.

ब्लॉगिंग करण्यासाठी Patience असणं खूप गरजेचं आहे, एक सफल ब्लॉग सुरु करण्यासाठी तुम्हाला कमीत कमी सहा महिने ते एक वर्ष तुमच्या ब्लॉग वर मेहनत करावी लागेल त्यानंतरच तुम्हाला ब्लॉगिंग मध्ये सफलता मिळणार.

निष्कर्ष

मित्रांनो ब्लॉग विषयी मला जेवढी Information माहिती होती ती सगळी माहिती मी या लेख च्या द्वारे तुम्हा सगळ्या लोकांसोबत share केली आहे, स्वतःचा ब्लॉग सुरू केल्यानंतर तुम्हाला regular तुमच्या ब्लॉग वर लेख लिहत राहावं लागणार. जर तुम्हाला ब्लॉगींग विषयी कोणताही प्रश्न असेल तर तुम्ही मला निश्चिंतपणे कमेंट करून किंवा ईमेल च्या द्वारे विचारू शकता.

Leave a Comment