Computer मध्ये WhatsApp कसे चालवायचे? | How to Use WhatsApp in Computer

0
68

मित्रांनो WhatsApp चा वापर पूर्ण जगामध्ये केल्या जातो, कारण WhatsApp हा Popular Instant Messaging App आहे. आजच्या काळात WhatsApp तुम्हाला सगळ्यांच्या Smartphone मध्ये बघायला मिळणार. WhatsApp चा वापर करणे खूप सोपे आहे WhatsApp ला Uneducated user सुद्धा use करू शकतो.

WhatsApp मध्ये आपल्याला खूप सारे Features मिळतात, जसे आपण Photos, Videos, Messages किंवा Documents share करू शकतो. पण काय तुम्हाला माहिती आहे की WhatsApp चा वापर तुम्ही फोन च्या व्यतिरिक्त Computer किंवा Laptop मध्ये सुद्धा करू शकता.

जर तुम्ही कोणत्या Office मध्ये काम करत असाल किंवा तुम्हाला मोबाईल मध्ये WhatsApp चालवायचे नसेल तर तुम्ही तुमच्या Laptop किंवा कॉम्प्युटर द्वारे सुद्धा WhatsApp चा वापर करू शकता. कॉम्प्युटर किंवा Laptop मध्ये WhatsApp कसे वापरायचे याबद्दल मी आज तुम्हाला माहिती सांगणार आहे.

Computer किंवा Laptop वर WhatsApp कसे चालवायचे?

मित्रांनो सुरुवात मध्ये जेव्हा WhatsApp launch झाला होता तेव्हा WhatsApp फक्त Smartphone users साठी available होता, त्यानंतर WhatsApp मध्ये खूप नवीन Features Add होत गेले आणि एक feature असा पण आला की तुम्ही कॉम्प्युटर मध्ये WhatsApp चा वापर करू शकता. हा feature त्या लोकांसाठी खूप चांगला आहे जे लोक जास्तीत जास्त वेळ कॉम्प्युटर किंवा Laptop वर असतात.

WhatsApp च्या feature मुळे users ला आता वारंवार WhatsApp Message check करण्यासाठी त्यांच्या मोबाईल मध्ये WhatsApp application ला बघावं नाही लागणार. व जर कोणती File किंवा Documents तुमच्या कॉम्प्युटर मध्ये असेल तर त्या File किंवा Document ला तुम्ही WhatsApp ने direct share करू शकता.

WhatsApp Web द्वारे कसे चालवायचे?

WhatsApp Web हा WhatsApp Messenger ला चालवण्याचा पहिला मार्ग आहे. तुम्ही WhatsApp Web दारे कोणत्याही Computer किंवा Laptop मध्ये बिना WhatsApp install केल्या WhatsApp Messenger चा वापर करू शकता. तुमच्या Laptop किंवा कॉम्प्युटर मध्ये WhatsApp चालवायचे असेल तर खालील सांगितल्या steps ला follow करावे.

Step 1: Open WhatsApp

सगळ्यात आधी तुमच्या कॉम्प्युटर किंवा Laptop मध्ये Browser open करायचा आहे व Browser मध्ये WhatsApp Web type करुन search करायचे आहे.

Step 2: Scan QR Code

Browser मध्ये WhatsApp Web search केल्यानंतर तुम्हाला WhatsApp web च्या official website मध्ये जायचं आहे. Website चे URL https://web.whatsapp.com आहे. तिथे गेल्यानंतर तुम्हाला एक QR Code दिसणार त्या QR Code ला तुम्हाला Scan करावं लागणार.

Step 3: Click On WhatsApp Web

WhatsApp वेबसाईट वरील QR Code scan करण्यासाठी तुम्हाला स्वतःच्या मोबाईल मध्ये WhatsApp Application ला open करायचे आहे तिथे तुम्हाला WhatsApp Menu वर क्लिक केल्यानंतर WhatsApp Web option वर क्लिक करावे लागणार. जसे तुम्ही WhatsApp Web वर क्लिक कराल तुमच्या मोबाईल मधला camera open होणार त्या Camera ने तुम्हाला QR Code ला Scan करायचे आहे.

QR Code ला तुमच्या मोबाईल मधील WhatsApp Web द्वारे Scan केल्यानंतर तुमच्या मोबाईल मधला WhatsApp Messenger तुम्हाला कॉम्प्युटर किंवा Laptop मध्ये दिसणार. आता तुम्ही निश्चिंतपणे बिना मोबाईल ला हात लावता तुमच्या कॉम्प्युटर मध्ये WhatsApp चा वापर करू शकता.

जर तुम्हाला WhatsApp Web चा वापर करायचा नसेल तर तुमच्या कॉम्प्युटर किंवा Laptop मध्ये तुम्ही WhatsApp Application सुद्धा install करू शकता. तुम्हाला WhatsApp च्या website मध्ये गेल्या नंतर WhatsApp for Mac or Windows PC वरती क्लिक करायचा आहे. त्यानंतर WhatsApp ला तुमच्या कॉम्प्युटर मध्ये install करावे लागणार.

निष्कर्ष

मित्रांनो Computer मध्ये WhatsApp वापरणे खूप सोपे आहे, मला खात्री आहे माझा हा लेख वाचल्यानंतर तुम्ही सुद्धा तुमच्या कॉम्प्युटर किंवा Laptop मध्ये WhatsApp चा वापर करू शकणार.

Previous articlePhonePe मध्ये Account कसे बनवायचे? | How to Create PhonePe Account in Marathi
Next articleफेसबुक अकाउंट कसे डिलीट करावे | How to Delete your Facebook Account in Marathi

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here