ब्लॉगर मध्ये Custom Domain कसे जोडायचे? | How To Add Custom Domain To Blogger

0
19

मित्रांनो स्वतःचा ब्लॉग सुरू केल्यानंतर बरेच लोकांना .Blogspot डोमेन ऐवजी Custom Domain वापरायचे आहे. जर तुम्ही सुद्धा GoDaddy वरून डोमेन विकत घेतले असेल व आता त्या Custom Domain ला तुम्हाला ब्लॉगर मध्ये जोडायचे असेल तर हा लेख तुमच्यासाठी आहे.

GoDaddy किंवा कोणत्याही डोमेन कंपनी चा Custom Domains ला तुम्ही ब्लॉगर सोबत कसे जोडणार या बद्दल मराठी भाषा मध्ये मी माहिती सांगणार आहे, तर या लेख ला पूर्ण वाचावे.

ब्लॉगर मध्ये Custom Domain का जोडावे?

मित्रांनो गूगल नी फ्री ब्लॉगिंग प्लेटफॉर्म Blogger.com या नावाने सुरू केला आहे, पण या प्लॅटफॉर्म मध्ये बरेच Limitations सुद्धा आहे. सगळ्यात मोठी कमी ही आहे की या मध्ये तुम्हाला एक Top Level Domain मिळणार नाही तुम्हाला Blogspot subdomain चा वापर करावा लागेल.

जसे मला माझ्या नावाचा ब्लॉग सुरू करायचा आहे तर माझ्या Blog Address राहणार NiranjanBhuite.com परंतु असा ब्लॉग address मला ब्लॉगर मध्ये नाही मिळणार, पण तुम्हाला ब्लॉगर मध्ये NiranjanBhuite.blogspot.com या नावाचा ब्लॉग address मिळून जाणार यालाच आपण sub domain म्हणतो.

सोप्या भाषेमध्ये म्हटला तर .blogspot मध्ये असलेले ब्लॉग professional वाटत नाही, अशा ब्लॉग Address च्या वेबसाईटला बघून माहिती पडून जाते की हि वेबसाईट कोणत्यातरी फ्री प्लॅटफॉर्म वर सुरू करण्यात आली आहे जे तुमच्या वेबसाईट चा Impression नक्की खराब करू शकतो.

पण जर तुम्हाला Custom Domain तुमच्या ब्लॉगर वेबसाईट वर वापरायचा असेल तर सगळ्यात आधी तुमचा आवडता custom domain तुम्हाला विकत घ्यावे लागेल. डोमेन GoDaddy वरून विकत कसे घ्यायचे याबद्दल मी आधीच लेख लिहिला आहे.

ब्लॉगर मध्ये Custom Domain कसे जोडायचे?

Step 1: सगळ्यात आधी Blogger.com मध्ये Login झाल्यानंतर तुमच्या ब्लॉग Dashboard मध्ये Setting नावाच्या option वर क्लिक करावे व scroll करुन Publishing या option वर तुम्हाला Custom Domain वर जायचे आहे.

Step 2: ब्लॉग address च्या खाली तुम्हाला Custom Domain असे बघायला मिळणार तिथे तुम्हाला click करायचे आहे.

Step 3: तुम्ही खरेदी केलेल्या Domain तुम्हाला Custom Domain मध्ये लिहायचा आहे, Custom Domain लिहितांना www चा वापर आधी करावे व त्यानंतर तुम्हाला Save बटन वर क्लिक करायचे आहे.

Step 4: Save बटन वर click केल्यानंतर तुम्हाला एक error बघायला मिळणार, तुम्हाला जरा पण घाबरायचे नाही आहे, तिथे तुम्हाला CName records चे काही codes दिले आहे ज्यांना तुमच्या Domain DNS मध्ये add करावे लागणार, तुम्हाला DNS Setting File या link वर क्लिक केल्यानंतर एक File Download व्हायला सुरुवात होणार.

Step 5: तुम्ही ज्या डोमेन registrar मधून डोमेन विकत घेतले आहे, तिथे तुम्हाला Login व्हायचे आहे, जसे मी डोमेन GoDaddy वेबसाईट वर विकत घेतले आहे तर मी GoDaddy वेबसाईट वर गेल्यानंतर Login करणार व My Products मध्ये आल्यानंतर माझ्या domain name च्या साईड ला DNS Settings मध्ये जाणार.

Step 6: त्यानंतर तुम्हाला Advance Features नावाचा एक section बघायला मिळणार जिथे तुम्हाला बरेच options दिसेल, तुम्हाला Import Zone File नावाच्या लिंक वर क्लिक करायचे आहे व तुम्ही डाउनलोड केलेली DNS File ला तिथे upload करावे लागणार.

Step 7: फाईल अपलोड केल्यानंतर पुढच्या 24 Hours मध्ये तुमचा Custom Domain ब्लोगर सोबत automatically connect होऊन जाणार.

Step 8: तुमचा Custom Domain ब्लॉगर मध्ये connect झाल्यानंतर तुम्हाला HTTPS redirect enable करायचं आहे.

मित्रांनो वरील सांगितल्या सगळ्या steps ला जर तुम्ही फोलो करणार तर तुम्ही सुद्धा तुमच्या ब्लॉग मध्ये custom डोमेन add करू शकणार.

निष्कर्ष

मला खात्री आहे तुम्हाला ब्लॉगर मध्ये custom डोमेन कसे जोडायचे या बद्दल पूर्ण माहिती मिळाली असेल, जर तुम्हाला डोमेन किंवा ब्लॉग बद्दल अधिक माहिती हवी असेल तर तुम्ही माझ्या ब्लॉग वरील अन्य लेख सुद्धा वाचू शकता.

Previous articleब्लॉगिंग मधून पैसे कसे कमवायचे?
Next articleइंस्टाग्राम वरून पैसे कसे कमवायचे?

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here