GoDaddy वरून डोमेन कसे विकत घ्यायचे? | How to Buy a Domain from GoDaddy

0
21

मित्रांनो जर तुम्हाला डोमेन नेम खरेदी करताना अडचण येत असेल तर तुम्हाला जराही घाबरायचे नाही आहे कारण आज या लेख मध्ये मी तुम्हाला GoDaddy वरून डोमेन कसे विकत घ्यायचे याबद्दल संपूर्ण माहिती सांगणार आहे.

काही वर्षापूर्वी लोकांना पैसे कमवण्यासाठी घराबाहेर जाऊन काम करावे लागत होते परंतु आजच्या काळामध्ये जर तुमच्याकडे Knowledge असेल तर तुम्ही इंटरनेट च्या मदतीने घरबसल्या पैसे कमवणे मध्ये सक्षम होऊ शकता, जर तुम्ही ठरवलेच आहे की तुम्हाला ब्लोगिंग द्वारे तुमचा carrier घडवायचं आहे तर तुमच्या ब्लॉगची branding असण्यासाठी तुम्हाला एक डोमेन ची गरज पडणार.

GoDaddy वरून डोमेन कसे विकत घ्यायचे?

मित्रांनो तुमच्या ब्लॉगसाठी डोमेन खरेदी करताना तुम्हाला जास्त investment करायची गरज नाही पडणार. इंडियन रुपयांमध्ये 200 ते 700 रुपयांमध्ये तुम्हाला डोमेन मिळून जाणार, तसे तर इंटरनेट वर डोमेन रजिस्ट्रेशन साठी खूप कंपनी आहे पण आज मी तुम्हाला GoDaddy वरून डोमेन कसे खरेदी करायचे याबद्दल सांगणार आहे.

GoDaddy वरून Domain खरेदी करताना तुमच्याकडे Credit Card/Debit Card किंवा Internet Banking असणे गरजेचे आहे. तुम्हाला GoDaddy वेबसाईट वरती विभिन्न प्रकारचे domain extension बघायला मिळणार ज्यामधून तुम्ही तुमचा आवडता डोमेन एक्सटेंशन खरेदी करू शकता.

Step 1: डोमेन नेम सर्च करा

1. तुमच्या कॉम्प्युटर किंवा smartphone च्या Web Browser मध्ये GoDaddy ची official वेबसाईट Open करावे.

2. GoDaddy च्या वेबसाईट मध्ये visit केल्यानंतर Home Page मध्ये तुम्हाला Search Box बघायला मिळणार तिथे तुम्हाला डोमेन नेम लिहायचं आहे.

3. तुम्हाला ज्या नावाचा डोमेन विकत घ्यायचं आहे तो डोमेन नेम type केल्यानंतर Search Domain नावाच्या बटन वर क्लिक करावे.

4. तुम्ही सर्च केलेला डोमेन व त्यात Domain च्या संबंधित काही Domain Extension तुम्हाला suggestion section मध्ये बघायला मिळणार, तुम्हाला ज्या प्रकारचा डोमेन एक्सटेंशन हवा ते सगळे domain extension इथे दिसणार.

5. डोमेन च्या बाजूला तुम्हाला डोमेन ची किंमत सुद्धा बघायला मिळणार, सगळ्या डोमेन एक्सटेंशन ची किंमत वेगवेगळी असते जसे .Com ची किंमत 499 रुपये आहे तसेच .In ची किंमत 299 रुपये आहे.

6. तुम्हाला आवडणारा डोमेन सिलेक्ट केल्यानंतर “Add to Cart” वर click करावे, तसेच तुम्हाला तो डोमेन किती वर्षासाठी विकत घ्यायचे आहे ते सुद्धा तुम्ही select करावे, GoDaddy मध्ये दोन वर्षासाठी Default ऑप्शन सिलेक्ट केल्या असते तिथे तुम्ही एक वर्ष select करून ‘Looks Good, Keep Going” बटन वर click करावे.

7. त्यानंतर तुम्हाला Domain Protection व काही Additional Information जसे Hosting select करायला म्हंटला जाणार ज्याला Fill केल्यानंतर तुम्हाला “Continue to Card” वर click करायचे आहे.

8. आता तुम्हाला Promo Code apply करायचा option बघायला मिळणार, तुमच्याकडे GoDaddy चा Promo Code असणार तर Promo Code apply करून तुम्हाला डोमेन थोडा स्वस्त दरात मिळणार, Promo Code apply केल्या वर “Ready to Pay” वर click करायचे आहे.

Step 2: GoDaddy वर रजिस्टर करावे

1. जर तुमचे GoDaddy वर पहिले पासून Account आहे तर तुम्ही Sign in बटन वर click करावे किंवा तुम्ही गूगल अकाउंट/फेसबुक अकाऊंट द्वारे सुद्धा GoDaddy वर Login करू शकणार.

2. जर तुम्ही GoDaddy वर New Customer आहात तर तुम्ही ई-मेल ऍड्रेस, युजर नेम व पासवर्ड Fill केल्यानंतर Create Account वर क्लिक करावे.

3. Billing Information मध्ये तुम्हाला तुमची “Country” select करावी लागणार व तुमचं First Name, last Name, Phone Number, Address, Postal Code इत्यादी लिहिल्यानंतर Save च्या बटन वर click करावे.

4. तुम्हाला ज्या Payment Method द्वारे डोमेन खरेदी करायचे आहे तो Payment Method तुम्ही ” Secure Payment” मध्ये Fill करू शकता, जसे तुम्ही Credit Card, Net Banking, UPI द्वारे पेमेंट करून Godaddyवर डोमेन खरेदी करू शकता.

5. तुम्ही पेमेंट केल्यानंतर खरेदी केलेले सगळे डोमेन तुम्हाला My Products मध्ये बघायला मिळणार, डोमेन Setup करणे किंवा डोमेन Name Server Change करण्याचे option सुद्धा My Products मध्ये बघायला मिळणार.

जर तुम्हाला GoDaddy वरून डोमेन Purchase करत असताना कसलीही अडचण येत असेल तर तुम्ही GoDaddy Customer Support Team सोबत संपर्क करून problem ला solve करू शकता.

निष्कर्ष

डोमेन खरेदी करताना तुम्हाला घाई गडबड करायची नाही आहे, व जर तुमच्याकडे जास्त पैसे नसेल तर तुम्ही GoDaddy वर स्वस्थ डोमेन जसे .In खरेदी करू शकता, मित्रांनो मला खात्री आहे तुम्हा सगळ्यांना GoDaddy वरून डोमेन कसे खरेदी करावे याबद्दल समजले असणार.

Previous articleब्लॉग म्हणजे काय? | What is Blog in Marathi?
Next articleब्लॉगिंग मधून पैसे कसे कमवायचे?

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here